मोरेश्वर - मोरगाव
अष्टविनायकांमध्ये सगळ्यात पहिले मंदिर आहे मोरेश्वर. अष्टविनायक यात्रेची सुरुवात येथूनच होते. मोरेश्वरदेवस्थान पुण्यापासून ५५ किलोमीटर लांब आहे.
सिद्धिविनायक - सिद्धटेक
सिद्धिविनायक किंवा सिद्धटेक गाव अहमदनगर जिल्ह्यात्तील कर्जत तालुक्यात आहे. हे मंदिर अष्टविनायक यात्रेतील दुसरे मंदिर आहे. याला सिद्धिविनायक या नावाने संबोधिले जाते कारण येथे भगवान विष्णू यांना सिद्धी प्राप्त झाली होती.
बल्लाळेश्वर - पाली
बल्लाळेश्वर देवस्थान महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात रोहा या ठिकाणाहून २८ किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर अंबा नदी आणि प्रसिद्ध सरसगड किल्ल्याच्या मध्ये स्थित आहे. पुण्यापासून बल्लाळेश्वर मंदिराचे अंतर २०० किलोमीटर आहे.
वरदविनायक - महाड
वरदविनायक महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील महाड येथे आहे. वरदविनायक मंदिरातील मूर्ती देखील स्वयंभू अर्थात आपोआप निर्माण झालेली आहे. ही मूर्ती १६९० साली मंदिराजवळील तळ्यात सापडली होती.
चिंतामणी - थेऊर
पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेले श्री चिंतामणी देवस्थान अष्टविनायकांतील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. हे मंदिर फार पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. सध्या असलेले मंदिर हे मोरया गोसावी यांनी बांधले.
गिरिजात्मज - लेण्याद्री
गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री या नावाने देखील ओळखले जाते. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात गणेश लेण्यांमध्ये स्थित आहे. पुण्यापासून या मंदिराचे अंतर ९५ किलोमीटर आहे.
विघ्नेश्वर - ओझर
ओझर येथील विघ्नेश्वर देवस्थान पुण्यापासून ८५ किलोमीटर अंतरावर आहे. पुणे-नाशिक रस्त्यावर पुणे जिल्ह्यातील जुनार तालुक्यात कुकडी नदीच्या काठी हे मंदिर आहे.
महागणपती - रांजणगाव
पुणे-नगर महामार्गावर पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर रांजणगाव येथे श्री महागणपती देवस्थान आहे.